‘भगवान जब भी देता है, छप्पर फाड के’ अशी म्हण आपल्याकडे आहे. पण चंदिगडमधील एका व्यक्तीच्या बाबतीत ही म्हण खरी ठरली आहे. येथील एका कामगाराने २०० रूपयाच्या उधारीवर लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि तो कोट्यधीश झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज कुमार असं या कामगाराचं नाव असून तो चंदीगड जवळील संगरूर जिल्ह्यात राहतो. मनोजला तब्बल १.५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. विशेष म्हणजे, त्याच्याकडे लॉटरीचं तिकीट विकत घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे २०० रुपये उधार घेतले होते. २९ ऑगस्ट रोजी मनोजने लॉटरी तिकीट घेतले होते. ‘पंजाब राज्य राखी बंपर 2018’ने लकी ड्रॉद्वारे १.५ कोटींचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. मनोजनेही या लकी ड्रॉचे तिकीट घेतले होते. लकी ड्रॉमध्ये आपला नंबर लागेल असा मनोजने विचार केला नव्हता मात्र नशीब फळफळले आणि रातोरात कोट्यधीश झाला.

‘पंजाब राज्य राखी बंपर 2018’ या लॉटरी स्पर्धेसाठी त्याने लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यामध्येच मनोजला पहिल्या क्रमांकाचं बक्षिस मिळालं आहे. त्यानंतर लॉटरीचं तिकीट घेऊन त्याने संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना तिकीट दाखवलं. अधिकाऱ्यांनीही मनोजला लॉटरीची रक्कम लवकरात लवकर देण्याचं आश्वासन दिलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laborer won 1 5 crore in lottery in sangrur punjab
Show comments