उत्तरकाशी जिल्ह्य़ात एका पुलाचे बांधकाम सुरू असतानाच तो पूल कोसळून एक मजूर ठार झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला संगमचट्टी परिसरातील हा पूल कोसळल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमी झालेल्यांना उत्तरकाशीतील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पुलाचे बांधकाम करणारे सर्व मजूर पश्चिम बंगालमधील होते.

Story img Loader