लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांनी कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेदरम्यान, दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर, जवळपास १५ ते २० शेजारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण प्रकारानंतर झालेल्या गोंधळात तीन वाहनं जाळण्यात आल्याचं वृत्त आहे. दरम्यान, या घटनेविषयी आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

लखीमपूरमधील घडलेल्या या दुर्घटनेबाबत एडीजी झोन ​​लखनऊ एसएन साबट यांनी सांगितलं की, “आतापर्यंत २ मृत्यूची नोंद झाली आहे. तर तीन जण जखमी आहेत. आयजी रेंज लखनऊ लक्ष्मी सिंह यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. या घटनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यांतील फौजही तैनात करण्यात आली आहे.”

Malkapur, Chainsukh Sancheti, Rajesh Ekde,
मलकापुरात विकासकामांचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी, चैनसुख संचेती आणि राजेश एकडेंमध्ये कलगीतुरा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Consumer centric approach harming interests of farmers
निवडणुकीपुरते  शेतकऱ्यांना चुचकारण्याचे धोरण
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
maharashtra assembly election 2024, raosaheb danve,
रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

नेमकं काय घडलं?

मीडिया अहवालानुसार, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा रविवारी (३ ऑक्टोबर ) तेनी गावात बनवीरमध्ये डेप्युटी सीएम केशव प्रसाद यांना भेटणार होते. यावेळी, शेतकऱ्यांनी गावाच्या मैदानात बांधलेल्या हेलिपॅडवर कब्जा केला. यावेळी, शेतकरी मंत्र्याच्या विरोधात आंदोलन करणार होते. टिकुनियामध्ये शेतकरी उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी उभे राहिले. तर याचवेळी लखीमपूर खेरीचे खासदार आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांचा मुलगा आशिष याने थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे.

राकेश टिकैत लखीमपूरसाठी रवाना

कार चालकाने शेतकऱ्यांना मागून धडक दिली. यात दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहवालानुसार, भाजपाच्या लोकांनी थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांच्या साथीदारांना चिरडलेल्या वाहनांची जाळपोळ केली. तर भारतीय किसान युनियनने असा दावा केला आहे की, या घटनेत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, घटनास्थळी तीन वाहने जाळण्यात आली आहेत. त्याचसोबत, शेतकरी नेते राकेश टिकैत हे गाझीपूरहून लखीमपूर खेरीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. तर परिसरातील परिस्थिती बिघडल्यानंतर योगी सरकारने एडीजी (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांना लखीमपूर खेरीला पाठवले आहे.