उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी हिंसाचारावरुन शिवसेनेने केंद्र सरकार, भाजपा आणि उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. लखीमपूर खेरीसारखा प्रकार भाजपाची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्ये घडला असता तर भाजपाची प्रतिक्रिया कशी असती, शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणारे करणे का गरजेचे आहे या आधी अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. सोमवारी पहाटेपासून स्थानबद्ध करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह ११ जणांना पोलिसांनी मंगळवारी केलेल्या अटकेवरही ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.
या गोष्टीचं भान तरी अटक करताना ठेवायला हवं होतं
“प्रियंका गांधी यांना योगी सरकारने अखेर अटक केली आहे. मागील ३६ तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरडय़ा जागेत प्रियंका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियंकांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियंकांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे. प्रियंका गांधी या काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर राजकीय हल्ले होऊ शकतात, पण देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करून भारताच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या त्या ‘नात’ आहेत, यांचे तरी भान प्रियंकांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते,” असा टोला या लेखामधून उत्तर प्रदेश सरकारला आणि भाजपाला लगावण्यात आलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा