Lalit Modi Fined By Mumbai High Court : इंडियन प्रीमियल लीगचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे. त्यांच्यावर असलेला अंमलबजावणी संचनालयाचा १०.६५ कोटी रुपयांचा दंड बीसीसीआयने भरावा असे निर्देश देण्याची याचिका ललित मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका निरर्थक असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. यासह न्यायालयाने ललित मोदी यांनी गैरसमज करणारी याचिका दाखल केल्याचे म्हणत त्यांना आणखी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.

यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, “झी टेलिफिल्म्सच्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले होते की घटनेच्या कलम १२ नुसार बीसीसीआय हे ‘राज्य’ नाही, त्यामुळे त्याविरुद्धची याचिका कायम ठेवता येणार नाही.”

Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Amit Shah unveils BJP’s Delhi manifesto with promises for Mahabharata Corridor, Yamuna Riverfront, and 50,000 government jobs.
महाभारत कॉरिडॉर ते ५० हजार सरकारी नोकऱ्या, दिल्लीसाठी भाजपाच्या तिसऱ्या जाहीरनाम्यात काय?
Nmmc chief dr kailas shinde warn builders over pollution
नियम मोडणाऱ्या बिल्डरांच्या परवानग्या रद्द; महापालिका प्रशासनाचा इशारा
rajasthan man arrested in kondhwa for opium sale worth rs 22 lakh
राजस्थानातील एकाकडून २२ लाख रुपयांची अफू जप्त
Anjali Damania on Dhananjay Munde
Anjali Damania: धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात? अंजली दमानियांनी केले नवे आरोप
Saif ali khan , Saif ali khan latest news,
सैफ हल्ला प्रकरणः सैफची सदनिका, इमारतीतून आरोपीचे १९ फिंगरप्रींट सापडले
Rahul Gandhi FIR
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल; देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता धोक्यात आणल्याचा दावा!

ललित मोदी यांनी परकीय चलन व्यवस्थापनाचे उल्लंघन केल्याबद्दल, अंमलबजावणी संचनालयाने त्यांना २०१८ मध्ये १०.६५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ललित मोदींनी हा दंड बीसीसीआयने भरावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने द्यावेत म्हणून याचिका दाखल केली होती.

ललित मोदी त्यावेळी बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. त्या काळात त्यांची बीसीसीआयची उपसमिती असलेल्या आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. उपनियमांनुसार, बीसीसीआयने मोदींना नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

हे ही वाचा : भारताच्या माजी क्रिकेटपटू विरोधात अटक वॉरंट, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

काय आहे प्रकरण?

२००९ च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतबाबत ईडीने तपास केला होता. मोदींवरील दंड हा ईडीने केलेल्या मोठ्या तपासाचा भाग होता, जिथे FEMA नियमांचे उल्लंघन करून २४३ कोटींहून अधिक रक्कम कथितपणे भारताबाहेर हस्तांतरित करण्यात आली होती. भारतात लोकसभा निवडणुकीचा कालावधी असल्याने २००९ मध्ये आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात आली होती.

हे ही वाचा : क्रौर्याचा कळस! सुनेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सासऱ्यांनी मिरची पावडर टाकली, सासूने दिले रॉडचे चटके; कुठे घडली घटना?

एकूण १२१ कोटींचा दंड

२०१८ मध्ये ईडीने बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि इतरांवर मिळून १२१.५६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. यामध्ये ललित मोदी यांच्या वाट्याला १०.६५ कोटी रुपयांचा दंड आला होता. हा दंड बीसीसीआयला भरण्याचे निर्देश द्यावेत म्हणून ललित मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Story img Loader