बिहारमधील पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक आयोजित केली होती. विरोधकांच्या या बैठकीवरून भाजपाने टीकास्र सोडलं आहे. नितीश कुमार यांनी २०२४ साठी पाटणामध्ये वऱ्हाडींना बोलावलं आहे. पण वऱ्हाडींमध्ये नवरदेवही असतो. २०२४ साठी तुमचा नवरदेव (पंतप्रधान पदाचा उमेदवार या अर्थाने) कोण आहे? असा सवाल भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवीशंकर प्रसाद यांच्या प्रश्नाला बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी अप्रत्यक्षपणे हटके उत्तर दिलं आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत राहुल गांधींना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला दिला आहे. यावेळी नितीश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींनी लांब दाढी वाढवल्याचं निदर्शनास आणून दिलं. यानंतर लालू प्रसाद म्हणाले की, “आता राहुल गांधींनी दाढी ट्रिम करण्याची वेळ आली आहे.”

हेही वाचा- “कितीही रक्त सांडलं तरी…”, ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

लालू प्रसाद यादव राहुल गांधींना उद्देशून पुढे म्हणाले, “आता लग्न करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आमच्या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही. आतापर्यंत तुमचं लग्न व्हायला हवं होतं. अजूनही वेळ गेली नाही. आमचा सल्ला ऐका आणि लग्न करून टाका. तुम्ही लग्नाला नकार दिल्याने तुमची आई (सोनिया गांधी) तक्रार करते. तीही तुमच्या लग्नाचा आग्रह करत आहे.”

हेही वाचा- VIDEO: विरोधी पक्षाची बैठक संपल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “देशात धार्मिक तेढ..”

लालू प्रसाद यादव यांनी एकप्रकारे रविशंकर प्रसाद यांना अप्रत्यक्ष उत्तर देत पुढे म्हणाले, “आम्हाला तुमच्या लग्नामध्ये वऱ्हाडी व्हायला आवडेल”. यावर राहुल गांधी स्मितहास्य करत म्हणाले,”तुम्ही सांगत आहात तर मी लग्न करेन, तुमच्या सल्ल्याचा विचार करू.” दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींच्या टी-शर्टचं कौतुकही केलं आहे. मोदी कुर्ता गुंडाळण्यासाठी तुमचा टी-शर्ट एकदम योग्य आहे, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lalu prasad yadav advice rahul gandhi to get married after opposition meeting in patana bihar nitish kumar rmm
Show comments