राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव गुरुवारी नियमित आरोग्य तपासण्या करण्यासाठी पाटण्याहून दिल्लीला गेले होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केलं. लालू प्रसाद यादव म्हणाले, जो कोणी पंतप्रधान होईल तो विनापत्नी (पत्नी नसलेला) असू नये. प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधी लालू प्रसाद यादव यांना विचारलं होतं की, महागठबंधनकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? तुम्ही काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता, तुम्ही त्यातून काय सूचवू पाहत होता? यावर लालू प्रसाद यादव म्हणाले, जो कोणी देशाचा पंतप्रधान बनेल तो विनापत्नी असू नये.

लालू प्रसाद यादव म्हणाले, पंतप्रधान हा पत्नी नसलेला असू नये. पंतप्रधानांच्या बंगल्यात जो कोणी राहणार असेल तो विनापत्नी तिथे राहू नये, पंतप्रधानांची पत्नी नसेल तर ते खूप चुकीचं आहे. पत्नीविना पंतप्रधानांच्या बंगल्यात राहणं चुकीचं आहे, ही परंपरा आता मोडली पाहिजे. महागठबंधनचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न विचारल्यावर लालू प्रसाद यादव म्हणाले, जो कोणी पंतप्रधान होईल, तो त्या बंगल्यात पत्नीबरोबर आला पाहिजे.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल
maharashtra assembly election 2024 rahul gandhi criticized pm modi at campaign rally
पंतप्रधानांना संविधानाची जाणच नाही; गोंदिया येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांची टीका
mayura kale vs sumit wankhede arvi assembly constituency election
लक्षणीय लढत : खासदार पत्नी विरुद्ध फडणवीसांचे विश्वासू असा सामना
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

काही दिवसांपूर्वी बिहारमधील पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही बैठक आयोजित केली होती. विरोधकांच्या या बैठकीवरून भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी टीका केली होती. रवीशंकर प्रसाद म्हणाले की, नितीश कुमार यांनी २०२४ साठी पाटणामध्ये वऱ्हाड बोलावलंय, त्यात एक नवरदेवही असतो. २०२४ साठी तुमचा नवरदेव (पंतप्रधान पदाचा उमेदवार या अर्थाने) कोण आहे?

हे ही वाचा >> “ठाकरे गट-मनसे युतीचा प्रस्ताव आला तर…”, संदीप देशपांडे यांचं वक्तव्य; म्हणाले, “तुमच्या वाईट परिस्थितीत…”

रवीशंकर प्रसाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना लालू प्रसाद यादव यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांना लग्न करण्याचा मिश्किल सल्ला होता. लालू प्रसाद म्हणाले की, “आता राहुल गांधींनी दाढी ट्रिम करण्याची वेळ आली आहे. आता लग्न करण्याची वेळ आली आहे. तुम्ही आमच्या सल्ल्याकडे लक्ष दिलं नाही. आतापर्यंत तुमचं लग्न व्हायला हवं होतं. अजूनही वेळ गेली नाही. आमचा सल्ला ऐका आणि लग्न करून टाका. तुम्ही लग्नाला नकार दिल्याने तुमची आई (सोनिया गांधी) तक्रार करते. तीही तुमच्या लग्नाचा आग्रह करत आहे.”