राजकीय वर्तुळात जसे नेतेमंडळींचे आरोप चर्चेचा विषय ठरतात, तशीच त्यांनी मिश्किलपणे एकमेकांवर केलेली टोलेबाजी देखील चर्चेत राहाते. पण राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव हे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. भाजपाच्या काही नेतेमंडळींकडून देखील हा व्हिडीओ व्हायरल केला जात असून त्यावरून “असे कसे नेता बनणार तुम्ही?” अशा खोचक शब्दांत निशाणा देखील साधला जात आहे. हा व्हिडीओ एका जाहीर कार्यक्रमातला असून यावेळी सभागृहात व्यासपीठावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ मान्यवर देखील उपस्थित असल्याचं दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं घडलं काय?

मंगळवार अर्थात १२ जुलै रोजी बिहार विधानसभेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त पाटण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाषण केलं. मात्र, त्यांच्या भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे.

तेजस्वी यादव यांनी केलेल्या दीड मिनिटाच्या भाषणात ते ५ वेळा अडखळले. त्यांच्या या भाषणाची क्लिप भाजपा नेते अजय सेहरावत यांनी ट्वीट करत खोचक टिप्पणी केली आहे. “ऐसे कैसा नेता बनेगा रे भाई” अशा शब्दांत ट्वीट करत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हे ट्वीट आता व्हायरल होऊ लागलं आहे.