मागील बऱ्याच दिवसांपासून आजारी असलेले ष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालूप्रसाद यादव यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. लालूप्रसाद यादव यांना त्यांची मुलीने स्वत:ची किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य जी सिंगापूरमध्ये असते, तिच्या किडनीमुळे लालूप्रसाद यादव यांना नवीन आयुष्य मिळणार आहे.

एकाचवेळी अनेक आजारांशी लढत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर किडनी प्रत्यारोपण प्रक्रिया सिंगापूरमध्ये होणार आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा की सिंगापूरमधील डॉक्टारांनी मान्यता दिली असून, किडनी प्रत्यारोपणाची सर्व तयारीही करण्यात आली आहे.

What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
Dharmarakshak Sambhaji movie, Karad ,
सातारा : ‘धर्मरक्षक संभाजी’ प्रदर्शित करा अन्यथा, दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू; कराडमध्ये सेवाभावी संस्थांचा इशारा
Crores spent by government on organ donation awareness But no liver transplant is done in any government hospital in the state
आनंदवार्ता… नागपुरात यकृत प्रत्यारोपण केंद्र.. गरीबांना शासकीय…
husband threw acid on wife, Amravati,
दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, अखेर पतीने चक्क ॲसिड…

हेही वाचा – पक्षासाठी दहावेळा तुरुंगात जाण्यास तयार; पाठीत खंजीर खुपसणे आमच्या रक्तात नाही – संजय राऊत

सिंगापुरमध्ये राहूनही रोहिणी आचार्य कायम आपल्या कुटुंबाच्या संपर्कात असते, एवढच नाहीतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बिहारच्या राजकारणावर टिप्पणी करत असते. अनेकदा स्वत:च्या कुटंबातील सदस्यांवर होणाऱ्या टीकांना तिने प्रत्युत्तरही दिले आहे. वडिलांची प्रकृती खालावल्यानंतर तिने आपल्या कुटुंबाला त्यांच्यावर सिंगापुरमध्ये उपचार करण्याचा आग्रह केला होता.

तिथे एकएक तास हा १०० दिवसांसारखा असतो ; मी स्वत:ला… – संजय राऊतांनी सांगितला तुरुंगातील अनुभव!

एवढच नाहीतर तिने स्वत: किडनी सेंटरमध्ये जाऊन उपचारासंबंधी चर्चा केली आणि लालूप्रसाद यांच्यावरील उपचाराचा पुढील मार्गही सुकर केला. लालूप्रसाद यादव हे मुलीची किडनी घेण्यास अजिबात तयार नव्हते, मात्र शेवटी रोहिणीने त्यांची समजूत काढली. तिने समजून सांगितले की कुटुंबातील सदस्याची किडनी घेतल्यास यशस्वीतेचे प्रमाण अधिक असते. सिंगापुरमधील सेंटर फॉर किडनी डिसीस येथे लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Story img Loader