बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार त्यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करतानाच, राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी, पाकिस्तानात नितीश यांच्यापेक्षा आपणच अधिक प्रसिद्ध असल्याचा दावा केला आह़े  पाकिस्तानी जनता आणि राजकारणी अजूनही माझ्याबद्दल आणि माझ्या प्रशासकीय कार्यक्षमतांबद्दल चर्चा करतात, असेही ते पुढे म्हणाल़े
परिवर्तन यात्रेदरम्यान बिहारच्या सहर्सा जिल्ह्यातील जाहीर सभेत ते बोलत होत़े  पुनरुत्थानासाठी पाकिस्तानी रेल्वे भारताच्या माजी रेल्वेमंत्र्याकडे सोपवायला हवी, असे वक्तव्य पाकिस्तानातील मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे खासदार सजीद अहमद यांनी गेल्या महिन्यात केले होत़े  त्याचा संदर्भ देत, लालू यांनी रेल्वेमंत्री म्हणून आपले योगदान, हा आजही पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असल्याचा दावा केला़  तसेच नितीश यांची पाकिस्तान भेट हा दैनंदिन कामकाजाचा भाग आह़े  त्यात विशेष काहीच नाही़  त्यामुळे नितीश यांनी राज्यातील अल्पसंख्यांकाच्या समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे, असा सल्लाही लालू यांनी दिला़    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा