गोमांस खाण्याचे समर्थन करणारे लालू प्रसाद यादव हे कृष्णाचे नव्हे तर कंसाचे वंशज असल्याची टीका रामदेव बाबा यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी लालूंनी परदेशात जाणारे भारतीय गोमांस खातात, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यावरूनच रामदेव बाबांनी लालूंना लक्ष्य केले. लालूंच्या आत सैतान दडला आहे. तोच त्यांना गोमांस खाण्याचे समर्थन करायला लावत आहे. या विधानामुळे लालूंनी यदुवंशीयांचा अपमान केला आहे. त्यामुळे आता त्यांना यदुवंशीय म्हणवून घेण्याचा हक्क उरलेला नाही. तेव्हा लालू यदुवंशीय नव्हे तर कंसाचे वंशज असले पाहिजेत, असे रामदेव बाबांनी म्हटले. बिहारमधील यादवांनी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. हीच जनता आगामी निवडणुकीत लालूंना धडा शिकवेल असेही रामदेव बाबांनी यावेळी सांगितले. यावेळी रामदेव बाबांनी उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या गोमांस बंदीच्या निर्णयाचे कौतूक केले. जर उत्तर प्रदेशात गोमांस बंदी लागू होऊ शकते तर, मोदी संपूर्ण भारतात हा निर्णय का लागू करत नाहीत, असा सवालही यावेळी रामदेव बाबांनी उपस्थित केला.

Story img Loader