Laluprasad Yadav : देशात जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील पक्ष सातत्याने जातनिहाय जनगनणा करण्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही, तर एनडीएचे घटकपक्ष असलेल्या जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्षानेही या मागणीचं समर्थन केलं आहे. दुसरीकडे भाजपाने ही मागणी म्हणजे हिंदू धर्मात फूट पाडण्याचा काँग्रेसचे प्रयत्न आहे, अशी टीका केली आहे. संघानेही या जनगणनेला विरोध दर्शवला होता. या सगळ्या मुद्द्यावरुन राजदचे नेते लालूप्रसाद यादव ( Laluprasad Yadav ) यांनी संघ आणि भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.

विरोधकांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी

विरोधकांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी होत असताना, भाजपाने मात्र ही मागणी म्हणजे हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका सातत्याने केली आहे. दुसरीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय समाज हा भाजपासून दूर गेल्याचं बघायला मिळालं आहे. त्यामुळे आता हळूहळू संघाने विरोध मावळता करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता लालूप्रसाद यादव ( Laluprasad Yadav ) यांनी संघ आणि भाजपाचे कान धरण्याची भाषा केली आहे.

Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Mammootty breaks silence
Mammootty : “चित्रपट म्हणजे समाजाचं प्रतिबिंब, त्यात..” ; हेमा समितीच्या अहवालावर अभिनेते मामुट्टींनी सोडलं मौन
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

हे पण वाचा- RSS चे जातनिहाय जनगणनेला समर्थनाचे संकेत, पण…

काय म्हटलं आहे लालूप्रसाद यादव यांनी?

भाजपा, Rss चे कान पकडून, दंड बैठका करायला लावू आणि जातनिहाय जनगणना करुन घेऊ. यांची लायकी आहे का? जातनिहाय जनगणनेला नाही म्हणायची? यांच्यापुढे आम्ही काही पर्यायच ठेवणार नाही. दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि गरीब या सगळ्यांनी एकजूट दाखवण्याची वेळ आता आली आहे. अशी पोस्ट लिहून लालूप्रसाद यादव ( Laluprasad Yadav ) यांनी भाजपा आणि संघावर टीका केली आहे.

जातनिहाय जनगणनेचा इतिहास काय आहे?

भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळी जातनिहाय जनगणना सुरु झाली. आपल्या देशात पहिल्यांदा १८७२ या वर्षी जातनिहाय जनगणना करण्यात आली. त्यानंतर १९३१ पर्यंत ही जातनिहाय जनगणना करण्यात आली. भारतात कुठल्या जातीचे किती लोक आहेत याची माहिती इंग्रजांकडे त्यावेळी होती. आपला देश १९४७ ला स्वतंत्र झाला. त्यानंतर १९५१ मध्ये पहिल्यांदा जातनिहाय जनगणना करण्यात आली. त्या आधारे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं वर्गीकरण करण्यात आलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे जातनिहाय जनगणना झाली नाही. १९८० नंतर भारतात अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला. त्यावेळी या राजकीय पक्षांचा केंद्रबिंदू जात होता. त्यानंतर जातनिहाय जनगणना करा ही मागणी सुरु झाली. २०११ मध्ये जातनिहाय जनगणना करण्यात आली. मात्र या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी सार्वजनिक करण्यात आली नाही. आता या जनगणनेला विरोध होत असला तरीही यावरुन लालूप्रसाद यादव ( Laluprasad Yadav ) यांनी भाजपा आणि संघाचे कान धरण्याची भाषा केली आहे.