राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे मेव्हणे साधू यादव यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. गांधीनगर येथे पाऊण तास ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्याशी संपर्क साधून चहापानाचे आमंत्रण दिले. काँग्रेस नेते असलेल्या साधू यादव यांनी भेटीबाबत सारवासारव केली आहे. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आपण गांधीनगर येथे आलो होतो. त्या वेळी मुख्यमंत्र्यांना सदिच्छा भेटलो असा दावा भेटीनंतर यादव यांनी केला. राज्यातील राजकीय स्थितीबाबत मोदींनी विचारणा केल्याचे त्यांनी सांगितले. लालूप्रसाद यांच्याबाबतही मोदींनी विचारणा केल्याचे यादव म्हणाले. साधू यांचे मित्र विजय यादव यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी ते आले होते. यादव यांच्यासोबत बिहार काँग्रेसचे नेते दसई चौधरी होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा