भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि जयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी यांनी ताजमहाल ज्या जमिनीवर बांधण्यात आलंय ती जमीन जयपूरच्या शाही कुटुंबाच्या मालकीची असल्याचा दावा केलाय. दिव्या कुमार यांनी या जमिनीचा मालकी हक्क सांगणारे कागदपत्रंही आपल्याकडे असल्याचा दावा केलाय.

दिया कुमारी यांनी केलेल्या हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे जेव्हा अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठासमोर भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ताजमहलमधील २२ बंद खोल्या उघडून त्यामध्ये हिंदू देवतांच्या मुर्ती आहेत का यासंदर्भात तपासणी करण्याची मागणी करण्यात आलीय. या याचिकेच्या समर्थनार्थ बोलताना भाजपाच्या नेत्या असणाऱ्या दिया कुमारी यांनी, “हे स्मारक उभारण्याआधी या ठिकाणी काय होतं याचा तपास केला पाहिजे. या ठिकाणी मकबरा उभारण्याआधी काय होतं हे जाणून घेण्याचा हक्क लोकांना आहे,” असं दिया यांनी म्हटलंय.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
Nana Patole
Nana Patole : अकोल्यातील सभेत नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य; भाजपाबद्दल बोलताना जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले?
NCP Ajit Pawar group
Nawab Malik : “आम्ही किंगमेकर राहणार, आमच्याशिवाय कोणतंही सरकार…”, अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

पुढे बोलताना दिया यांनी ताजमहल बांधण्यात आलेल्या जमिनीची मालकी जयपूर घराण्याकडे असल्याचे पुरावे आहेत, असा दावाही केलाय. गरज पडल्यास आपण हे पुरावे सादर करु असंही त्या म्हणाल्यात. दिया कुमारी यांनी मुघल सम्राट शहा जहाँने आमच्या कुटुंबाच्या ताब्यातील जमीन घेतल्याचाही दावा केलाय, असं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

“या मोबदल्यात भरपाई देण्यात आलेली मात्र ती नेमकी किती होती, ती स्वीकारण्यात आली की नाही याबद्दल मी काही सांगू शकत नाही कारण माझा त्याबद्दलचा अभ्यास नाही. हे आमच्या पोथीखाण्यामधील कागदपत्रांमध्ये आहे,” असं दिया म्हणाल्या.

यासंदर्भात याचिका दाखल करणार आहात का याबद्दल विचारलं असता. राजघराण्यातील माजी सदस्य असणाऱ्या दिया यांनी राजघरण्याच्यावतीने याचिका दाखल करायची की नाही याबद्दल विचार सुरु आहे, असं सांगितलं.