पुणे जिल्ह्य़ातील माळीण गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले त्या घटनेची पुनरावृत्ती मणिपूरमधील जौपी परिसरात शनिवारी घडली आहे. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या चंडेल जिल्ह्य़ातील अत्यंत दुर्गम चौपी परिसरातील एक गाव दरड कोसळल्याने पूर्ण गाडले गेले असून या दुर्घटनेत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची खबर मिळताच पोलीस आणि मदतकार्य पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. खंगजॉय विभागातील कुकी समाजाचे वर्चस्व असलेले जौमोल हे गाव दरड कोसळून गाडले गेले आहे. शेजारच्या गावातील नागरिक मदतकार्य करण्यास असमर्थ ठरले आहेत. सततच्या पावसामुळे ही घटना घडली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-08-2015 at 06:14 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land slide in manipur