केदारनाथ यात्रा मार्गावर असलेल्या गौरीकुंड इथे आज सकाळी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. काही वेळेतच उत्तराखंड राज्याची आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी घटनास्थळी पोहचली असून जखमींना मदत आणि दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती.
यामुळे या मार्गावरील यात्रा काही वेळ थांबवावी लागली होती. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत एक्सच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मृत्युमूखी पडलेल्यांबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले असून मदत कार्यावर लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं आहे.