जम्मू काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यामध्ये दरड कोसळल्यानं झालेल्या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला आहे. ‘रॅटल’ जलविद्युत प्रकल्पात ही दूर्घटना घडली आहे. या घटनेत सहा लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Explosion In Baghdad: बगदादमधील फुटबॉल स्टेडियमजवळ स्फोट; १० जणांचा मृत्यू, २० जखमी

“जलविदयुत प्रकल्पातील बचावकार्य पूर्ण झालं आहे. या परिसरात चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. सहा जखमी लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं आहे”, अशी माहिती किश्तवारचे उपायुक्त देवांश यादव यांनी दिली आहे. दरम्यान, बचावकार्यासाठी पाठवण्यात आलेले सहा जणांचे पथक ढिगाऱ्याखाली अडकले होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र शर्मा यांनी दिली आहे.

Bharat Jodo Yatra: “राहुल गांधी यांनी माझा हात धरला, कारण…” अभिनेत्री पुनम कौरचं भाजपाला सडेतोड उत्तर

‘रॅटल’ जलविद्युत प्रकल्प हा चिनाब नदीवरील प्रस्तावित प्रकल्प आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या प्रकल्पाची अंदाजित किंमत पाच हजार २०० कोटी होती. या प्रकल्पासाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामाचं कंत्राट १८ सप्टेंबरला देण्यात आलं आहे.

Story img Loader