हिमाचल प्रदेशात सततच्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. यात अनेकांना बेघर होण्याची, तर अनेकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली. एक इमारत कोसळत असताना आपला जीव वाचवण्यात यशस्वी झालेल्या महिलेने मात्र उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. राहत होती ती इमारत भुस्खलनात कोसळल्यानंतर या महिलेने यापेक्षा मृत्यू परवडला, अशी तीव्र भावना व्यक्त केली. प्रोमिला असं या महिलेचं नाव आहे. प्रोमिलाला वडील नाहीत आणि भावंडंही नाहीत. नवऱ्यापासून त्या विभक्त झालेल्या आहेत. त्या आईबरोबर एकट्याच राहतात. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंतच झालेलं आहे.

पीटीआयला दिलेल्या प्रतिक्रियेत प्रोमिला म्हणाल्या, “मी या ठिकाणी माझ्या ७५ वर्षीय आईबरोबर राहत होते. माझ्या आईला कँसर झालेला आहे. तिच्यावर २०१६ पासून उपचार सुरू आहेत. मंदी आल्याने ग्राहकच नाही आणि त्यामुळे मागील आठवड्यात सेल्स गर्लचा माझा जॉबही गेला आहे.”

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

“सध्या माझ्याकडे केवळ आई आहे”

“कुठेच जायला जागा नव्हती म्हणून मी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात झोपले. मला सध्या आईवर उपचार करण्यासाठी नोकरीची फार गरज आहे. मी अगदी स्वच्छतेचं कामही करायला तयार आहे. सध्या माझ्याकडे केवळ आई आहे. आमचं घर कोसळत असताना आम्ही घराबाहेर पडलो. त्यामुळे आमच्याकडे सध्या काहीच नाही, केवळ अंगावरील कपडे आहेत,” असं प्रोमिला यांनी सांगितलं.

हेही वाचा : रस्ते-पूल-लोहमार्ग गेले वाहून, घरंही कोसळली; हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार

दरम्यान, शिमलामध्ये मागील आठवड्यात अनेक भुस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. मागील १० दिवसात पावसात झालेल्या दुर्घटनांमध्ये एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात समरहिल भुस्खलनातील १७ जणांचा, फागली येथील ५ जणांचा आणि कृष्णानगर येथील २ जणांचा समावेश आहे. अशा घटनांमध्ये मागील महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये १२० जणांचा मृत्यू झाला आहे. २४ जूनला मान्सून सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण २३८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जण बेपत्ता आहेत.