तालिबान्यांनी किमान एका वर्षांसाठी युद्धभूमीचा त्याग करावा म्हणून ब्रिटनच्या ‘इंटरनॅशनल सिक्युरिटी फोर्स’ या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुमारे ६० लाख पौंड रकमेची लाच देण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला आहे. खटल्यांपासून माफीचाही प्रस्ताव असून ब्रिटिश आणि नाटोच्या सैन्याचा शत्रूपासून बचाव व्हावा, या हेतूने तालिबान्यांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अमेरिकी फौजा अफगाणिस्तानातून २०१४ मध्ये बाहेर पडणार असून त्या पाश्र्वभूमीवर ब्रिटनच्या या प्रस्तावास काहीसे महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी लक्षावधी पौण्डची रक्कम खर्ची घातली जात असली तरी तालिबान्यांकडून या ‘करारा’स कितपत प्रतिसाद मिळेल, याची खात्री नाही.

Story img Loader