एपी, वॉशिंग्टन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त राज्य अमेरिका आणि रशियाने सोव्हिएतनंतरच्या इतिहासातील सर्वात मोठी कैद्यांची अदलाबदल गुरुवारी पूर्ण केली. याअंतर्गत मॉस्कोने वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार इव्हान गेर्शकोव्हीच आणि मिशिगन कॉर्पोरेटचे सुरक्षा अधिकारी पॉल व्हेलन यांची बहुराष्ट्रीय करारानुसार सुटका केली. या दोघांच्या बदल्यात जवळपास दोन डझन लोकांचीही सुटका करण्यात आली असल्याची माहिती तुर्कीस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली. ही अदलाबदल करण्यापूर्वी गुप्त बैठक झाली होती.

गेर्शकोव्हीच यांना १६ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांना २९ मार्च २०२३ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर तसेच व्हेलन यांच्यावरसुद्धा हेरगिरीचे आरोप होते. यापूर्वी अमेरिकन अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी गेर्शकोव्हिच यांच्या बदलीचा प्रस्ताव सादर केला होता, जो रशियाने फेटाळला होता. व्हाईट हाऊसने याबाबत त्वरित कोणतीही माहिती दिली नाही. कैद्यांची अदलाबदली ऐतिहासिक असली तरी अमेरिकन नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात रशियाला किंमतही चुकवावी लागली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Largest prisoner swap between the united states and russia amy
Show comments