लष्कर-ए-तय्यबा ही दहशतवादी संघटना दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ले घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. दिल्लीतील गर्दीची ठिकाणे आणि हाय प्रोफाईल व्यक्ती या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचेही समजत आहे. गुप्तचर खात्याने दिल्ली पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तय्यबाचे दुजान आणि कुशान हे दोन हस्तक पाकवाप्त काश्मीरमधून भारतात शिरले आहेत. दिल्लीच्या लोधी कॉलनी परिसरात १ डिसेंबर रोजी यासंबंधी एफआयआरदेखील दाखल करण्यात आली होती. या एफआरआयमध्ये नमूद केल्याप्रमाणे लष्कर-ए-तय्यबा दिल्ली आणि अन्य भागात दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी दोन दहशतवादी दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्याकडून फियादीन किंवा बॉम्बहल्ला करण्यात येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली पोलीस सध्या लष्कर-ए-तय्यबाच्या या अतिरेक्यांचा शोध घेत आहेत.  गेल्या काही महिन्यांमध्ये जगभरातील अनेक देश दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहेत. त्यानंतर भारतावरही हल्ल्याचे सावट आहे.

Story img Loader