पीटीआय, श्रीनगर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान एका दहशतवाद्याला ठार मारण्यात ‘बिस्किटां’नी महत्त्वाची भूमिका बजावली. ही मोहीम केवळ धोरणात्मक नियोजनच नव्हे तर बिस्किटांचा कल्पकतेने वापर करून यशस्वी करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेत अपारंपरिक पद्धतींचा वापर करण्यात आला. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत या मोहिमेचे यश महत्त्वपूर्ण असून सुरक्षा दलांची कल्पक रणनीतीही दर्शवते.
स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने अतिशय चतुराईने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवादी संघटना लष्कर ए तैयबाचा (एलईटी) पाकिस्तानी कमांडर उस्मानला श्रीनगरमधील खान्यार भागात दिवसभर झालेल्या चकमकीत ठार करण्यात आले. स्थलांतरित आणि सुरक्षा दलांना नेहमीच लक्ष्य करणाऱ्या एलईटीची उपसंघटना ‘द रेजिस्टेंस फ्रंट’विरोधात सुरक्षा दलाने यशस्वी केलेली ही मोहीम महत्त्वाची आहे.
हेही वाचा >>>संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
कल्पक रणनीती
कारवाईदरम्यान सर्वाधिक चिंता होती ती बेवारस कुत्र्यांची. सुरक्षा दलाला पाहताच ते कधीही भुंकू शकत होते व त्यामुळे दहशतवादी सावध होण्याची भीती होती. मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाने कुत्र्यांना बिस्किटे खाऊ घातली. त्यामुळे कुत्रे न भुंकल्याने दहशतवादी बेसावध राहिले. सुरक्षा दल सकाळच्या नमाजापूर्वीच परिसरात तैनात करण्यात आले. यावेळी जवळपास ३० घरांना सुरक्षा दलाने वेढा घातला होता.
चार जवान जखमी; आव्हानांचा सामना करण्यास सज्ज
अनेक तासांच्या या चकमकीनंतर उस्मानला ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आले. या चकमकीत चार जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दल कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी तसेच मोहिमेची परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी अद्वितीय उपायांचा अवलंब करण्यास तत्पर असल्याचे या मोहिमेच्या यशाने सिद्ध झाले.