देशात करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन सज्ज आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने कमी होत आहे. सलग तीन दिवस दिल्लीत करोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. दिल्लीत करोनामुळे आतापर्यंत एकून २५ हजार ७९ जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात दिल्लीत २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिल्लीत करोना वाढीचा दर हा ०.०४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता ३९८ वर पोहोचली आहे. वर्षभरातील सर्वात कमी सक्रिय रुग्णांची नोंद आहे. सध्या १२९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
दिल्लीत आतापर्यंत एकूण १४ लाख ३७ हजार ३१७ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १४ लाख ११ हजार ८४० जणांनी करोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांचा दर हा ०.२७ टक्के इतका आहे. तर करोनातून बरे होण्याचं प्रमाण हे ९८.२२ टक्के इतकं आहे.
Delhi reports 24 fresh COVID cases and 56 recoveries today
Active cases: 398
Total recoveries: 14,11,840
Death toll: 25,079 (no new deaths) pic.twitter.com/NXqqLIkNTv— ANI (@ANI) August 22, 2021
देशभरातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तरी देखील अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. त्यामुळे करोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. तर, दुसऱ्या बाजूला करोनातून रोज बरे होणाऱ्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर आढळून येत असल्याने, काहीसा दिलासा मिळत आहे. मागील काही दिवसांमध्ये रोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनातुन बरे झालेल्यांची संख्या ही अधिक दिसून आली आहे. मागील २४ तासांमध्येही देशात ३० हजार ९४८ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३८ हजार ४८७ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ४०३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.