पेरूची राजधानी लिमामध्ये विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या ‘लताम’ एअरलाइन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. धावपट्टीवरील अग्निशमन दलाच्या एका ट्रकला विमानाची धडक बसल्याची थरारक दृष्य समोर आली आहेत. या धडकेनंतर लागलेल्या आगीत विमान जळून खाक झालं आहे. या दूर्घटनेतून विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी बचावले आहेत. मात्र, दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘एअर शो’मध्ये हवेतच दोन विमानांची धडक; सहा जण दगावल्याची भीती, पाहा अपघाताचा थरारक VIDEO

या थरारक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओमध्ये प्रवासी विमान धावपट्टीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अग्निशमन दलाच्या ट्रकला धडकताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत धडकेनंतर विमानाने पेट घेतल्याची दृश्य कैद झाली आहेत. एंजल टोरेस आणि निकोलस सांता गदेआ, या जवानांचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे.

(एलए २२१३) हे विमान लिमाच्या जॉर्ज शावेझ आंतराराष्ट्रीय विमानतळावरुन ज्युलियाकाला पोहोचण्यासाठी निघालं होते. मात्र, उड्डाण घेण्यापूर्वीच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ही घटना घडताच तातडीनं बचावकार्य राबवण्यात आलं. पेरूच्या आरोग्य मंत्रालयानुसार, या दुर्घटनेत जखमी २० प्रवाशांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या अग्निशामक दलाच्या दोन जवानांच्या कुटुंबीयांप्रती पेरूचे अध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी सहानुभूती व्यक्त केली आहे. विमानतळ प्रशासनाकडून या घटनेचा तपास केला जात आहे.