अफझल गुरू याला फासावर लटकविल्यानंतर, ‘देर आए, दुरुस्त आए’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी हल्ला करण्यात आला, त्यावेळी तेथे कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेले मातबरसिंग नेगी यांच्या पुत्राने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. अफझलला फासावर लटकविल्याने दहशतवादी गटांना कडक संदेश मिळाला आहे, असेही गौतम नेगी म्हणाले. अफझल गुरूला यापूर्वीच फासावर लटकविणे गरजेचे होते. विलंब झाला असला तरी ‘देर आए, दुरुस्त आए’, असे गौतम नेगी म्हणाले. वृत्तवाहिन्यांवरूनच गौतम आणि त्याच्या कुटुंबीयांना अफझलला फासावर लटकविण्यात आल्याची खबर मिळाली. अफझल गुरूला फासावर लटकविण्यात आले तीच योग्य शिक्षा आहे आणि त्यामुळे संसदेवरील हल्ल्याबाबत करण्यात येणारे राजकारण संपुष्टात येईल. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यात आल्यापासून अफझललाही फासावर लटकविण्यात येईल, अशी आम्हाला आशा होती, असेही गौतम नेगी यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा