Jayalalithaa’s Death Probe Report: तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची एक लीक झालेली ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला अरुमुघस्वामी आयोगाचा अहवाल राज्य विधानसभेत सादर झाल्यानंतर पुढे आलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे जयललिता यांच्या मृत्यूच्या तपासाला वेगळं वळण लागलं आहे.

जयललिता यांचा मृत्यू नेमका कसा झाला? चौकशी आयोगाचा अहवाल सादर; चार व्यक्ती कारणीभूत ठरल्याचा दावा!

अरुमुघस्वामी आयोगाच्या अहवालात जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला, त्यांचे नातेवाईक डॉक्टर अशिवा कुमार, माजी आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर आणि माजी आरोग्य सचिव राधाकृष्णन यांची चूक आढळून आली आहे. काही बाबींना गृहित धरून हा अहवाल बनवण्यात आल्याची प्रतिक्रिया यावर शशिकला यांनी दिली आहे. जयललिता यांच्या मृत्यूचं राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

जया मृत्यू प्रकरण:  स्टॅलिन कॅबिनेट समितीने शशिकला विरोधात चौकशीचे आदेश दिल्याने राजकारण तापले 

अरुमुघस्वामी आयोगाच्या अहवालात जयललिता यांच्या मृत्यूवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जयललिता यांच्या मृत्यूची वेळ एक तासाने लांबली, अँजिओग्राफी करण्यात आली नाही, याबरोबरच या उपचारांमध्ये शशिकला यांचा हस्तक्षेप होता, असा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

नवे अध्यक्ष मिळताच काँग्रेसने शशी थरुर यांना फटकारलं, म्हणाले “दुतोंडी असल्यासारखे आमच्यासमोर एक आणि…”

या घटनाक्रमादरम्यान जयललिता यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाची त्यांची ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये जयललिता चिडचिड, तक्रार करताना आणि खोकलताना ऐकू येत आहेत. २०१७ सालाचा डॉ. रिचार्ड बअले यांचा चेन्नईतील पत्रकार परिषदेनंतरचा व्हिडीओदेखील सध्या व्हायरल होत आहे. “सुरवातीला समतोल राखणं अवघड होतं” असं या व्हिडीओत रिचार्ड बोलताना दिसत आहेत. जयललिता यांना परदेशात जाणं गरजेचं आहे का? असा सवाल या व्हिडीओत शशिकला विचारताना दिसत आहेत. त्यावर त्यांचं परदेशात जाणं आवश्यक असल्याचं सांगताच दोघेही त्यावर सहमती दर्शवताना व्हिडीओत दिसतात. दरम्यान, जयललिता यांना उपचारांसाठी परदेशात जायचं नव्हतं, असं यानंतर पुढे आलं आहे.

Story img Loader