तृणमूल काँग्रेसचे नेते आणि त्यांची संतापजनक वक्तव्ये हे जणू समीकरणच बनले आहे. आताही ‘जब तक सुरज चाँद रहेगा, बलात्कार तेरा नाम रहेगा’, अशा आशयाचे संतापजनक वक्तव्य करून तृणमूल काँग्रेसचे आमदार दीपक हलदर यांनी आपल्या असंवेदनशीलतेचा परिचय करून दिला.  
जोवर विश्वाचे अस्तित्व आहे तोपर्यंत बलात्काराच्या घटना होणार असे ते म्हणाले. यापूर्वी तृणमूलचे खासदार तपस पॉल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यापाठोपाठ आता या आमदार महाशयांनी डायमंड हार्बरमधील एका सभेत मुक्ताफळे उधळली आहेत. हलदर यांनी बलात्कार हा सामाजिक आजार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकटय़ा हा प्रश्न सोडवतील हे शक्य नाही.
हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच धर्तीवर हे वक्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया माकपच्या रितुब्रता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा