बनावट नोटांचा सुळसुळाट रोखणे आणि नोटांचे आयुष्य वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, कागदी नोटांऐवजी प्लॅस्टिकच्या नोटा प्रायोगिक तत्वावर बाजारात आणण्यात येणार आहेत. सुरूवातीला दहा रूपये मुल्याच्या एक अब्ज प्लॅस्टिक नोटा देशातील पाच शहरामध्ये चलनात येणार आहेत. मात्र, सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांचा वापरही पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या शहरांमध्ये या नोटा चलनात येणार आहेत. जर प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण देशात दहा रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा अस्तित्वात येणार आहे.