समानव अवकाश उड्डाणाच्या रंगीत तालमीचा भाग म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो जीएसएलव्ही एमके ३ या प्रक्षेपकाच्या मदतीने एक अवकाशकुपी (क्रू मॉडय़ुल अ‍ॅटमॉस्फेरिक रिएंट्री एक्सपिरीमेंट) अवकाशात पाठवणार आहे व त्याची चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली. नऊ तास ३० मिनिटांच्या चाचणीत इस्रोच्या एलव्हीएम ३ ने यश मिळवले.
उलटगणती १७ डिसेंबरला  
इस्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीएसएलव्ही/एक्स केअर मिशन (एलएमव्ही ३) या प्रक्षेपणाची उलटगणती १७ डिसेंबरला  सकाळी साडेआठ वाजता सुरू होणार असून हे यान श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित होणार आहे.  
उलटगणती २४ तासांची असून १८ डिसेंबरला सकाळी ९ वाजता हे उड्डाण होणार आहे. जीएसएलव्ही एमके ३ हा अग्निबाण ही कुपी सोडणार असून तो ३.६५ टन वजन वाहून नेणार आहे.
पूर्वतयारी
अवकाशात अंतराळवीरांना पाठवण्याची ही पूर्वतयारी आहे. भारत सरकारने मात्र अजून मानवी उड्डाणाला परवानगी दिलेली नाही. जीएसएलव्ही ४२.४ एमके ३ मीटर उंच प्रक्षेपक असून तो जड उपग्रह सोडण्यासाठी वापरला जाईल.
 इन्सॅट ४ सारखे ४५००-५००० किलो वजनाचे उपग्रह सोडण्यास तो सक्षम असेल. व्यावसायिक प्रक्षेपक उड्डाणांच्या स्पर्धेत भारताची क्षमता त्यामुळे वाढणार आहे.