तामिळनाडूमध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, असे आवाहन द्रमुकने राज्यपाल के. रोसय्या यांना केले आहे. सत्तारूढ अभाअद्रमुकच्या नेत्या जयललिता यांना तुरुंगात टाकल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अभाअद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी न्यायपालिकेवरही हल्ला चढविला आहे, असे द्रमुकने म्हटले आहे.
तामिळनाडूत कायद्याचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी घटनेने जे अधिकार दिले आहेत त्याचा वापर करावा, असे आवाहन द्रमुकचे सचिव आर. एस. भारती यांनी के. रोसय्या यांना एका निवेदनाद्वारे केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून कृती करावी आणि ज्यांनी कायद्याचा भंग केला आहे अशा सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही राज्यपालांना करण्यात आली आहे. जयललिता यांना तुरुंगाची हवा खावी लागल्यानंतर अभाअद्रमुकचे मंत्री आणि काही पदाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आंदोलने केली, असा आरोप द्रमुकने केला आहे. बसगाडय़ा जाळण्यात आल्या आणि आमच्या पक्षाच्या कार्यालयांवरही हल्ला करण्यात आला, असेही द्रमुकने म्हटले आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा