Lawrence Bishnoi Gang 10 Targets : माजी मंत्री झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहभागाच्या चर्चेमुळे पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रीय असलेली लॉरेन्स बिश्नोई टोळी महाराष्ट्रातही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अमेरिका, कॅनडा येथून या टोळीचा कारभार चालवणाऱ्या अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खान याच्या घरावरही गोळीबार घडवून आणला होता. याद्वारे त्याने मुंबईतील व्यावसायिक, बॉलिवूड कलाकार व चित्रपट निर्मात्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. समाजमाध्यमांचा वापर करून ही टोळी राज्यात हातपाय पसरत आहे.

दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीने अनेक धनाढ्य लोकांकडे खंडणीची मागणी केली आहे. अभिनेता सलमान खानसह देशभरात अनेक लोक या टोळीच्या टार्गेटवर आहेत. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला मुक्त केल्यानंतर बिश्नोई टोळीने सलमानला धमकी दिली होती. “सलमान खानने काळवीट मारलं आहे. त्याला सर्व प्रकरणांमधून दोषमुक्त करण्यात आलंय. त्याने काळवीटाची शिकार करुन खूप मोठी चूक केली आहे. आम्ही उघडपणे सांगतोय की पुढे आम्ही सलमानचा कार्यक्रम करणार. यामध्ये कोणतीच शंका नाही,” असा इशारा बिष्णोईने टोळीचा प्रमुख असणाऱ्या लॉरेन्स विष्णोईचा मानलेला भाऊ राजवीर सोपूने दिला होता. तेव्हापासून ही टोळी सलमानच्या मागे लागली आहे.

सलमान खानप्रमाणे इतरही अनेकजण या टोळीच्या टार्गेटवर

टार्गेट २ : शगूनप्रीत, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याचा व्यवस्थापक

टार्गेट ३ : मनदीप धालीवाल, कुख्यात गुंड लकी पटियालचा साथीदार

लॉरेन्स बिश्नोईने एनआयएला सांगितलं होतं की “मनदीपने मुद्दुखेराच्या मारेकऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे आमची टोळी एक दिवस त्याला संपवेल”. मनदीप ‘ठग्स लाइफ’ नावाची टोळी चालवतो.

टार्गेट ४ : कुख्यात गुंड कौशल चौधरी

बिश्नोईने एनआयएएला सांगितलं होतं की मुद्दुखेराच्या हत्येत गुंड कौशल चौधरीचाही हात होता. त्यानेच या हत्येसाठी शस्त्रे पुरवली होती. तेव्हापासून चौधरी बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहे.

टार्गेट ५ : कुख्यातगुंड अमित डागर

बिश्नोईने एनआयएएला सांगितलं होतं की अमित डागर आणि कौशल चौधरीने मिळून मुद्दुखेराच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळेच डागर देखील बिश्नोई टोळीच्या टार्गेटवर आहे.

टार्गेट ६ : सुखप्रीतसिंग बुढ्ढा

सुखप्रीतसिंग हा बांभिया टोळीचा प्रमुख आहे. लॉरेन्श तुरुंगाबाहेर होता तेव्हा या दोन टोळ्यांचा खूप वर्षे संघर्ष चालला होता. बिश्नोई तुरुंगात गेल्यापासून त्याच्या धंद्यात इतर टोळ्यांनी घुसखोरी केल्याचं त्याने एनआयएला सांगितलं होतं.

टार्गेट ७ : कुख्यात गुंड लकी पटियाल

कुख्यात गुंड लकी पटियालने माझ्या साथीदारांना ठार मारलं आहे. त्यामुळे एक दिवस मी त्यालाही ठार करेन असं लॉरेन्स बिश्नोईने पोलीस चौकशीत सांगितलं होतं.

टार्गेट ८ : कुख्यात गुंड रम्मी मसाना, गोंडार टोळीचा सदस्य

टार्गेट ९ : गुरप्रीत शेखो, गोंडार टोळीचा सदस्य

टार्गेट १० : भोला शूटर, सनी लेफ्टी, अनिल लठ
हे तिघेही मुद्देखेराच्या हत्येच्या कटात सामील होते असा आरोप लॉरेन्श बिश्नोईने केला आहे. त्यामुळे बिश्नोईची टोळी या तिघांच्या मागावर आहे. नॅशनल हेराल्डने ही दहा जणांची यादी प्रसिद्ध केली आहे.