दिल्लीतील एका उद्योगपतीच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी हल्लेखोरांनी आठ राऊंड फायर केले. हा हल्ला लॉरेन्स बिष्णोई गॅंगची शत्रू टोळी असलेल्या बंबीहा गॅंगने केल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार बिलाल अंसारी (२२) आणि शोएब (२१) असं या दोघांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांनी दिल्लीतील राणीबाग भागात राहणाऱ्या एका उद्योगपतीच्या घरावर गोळीबार केला. त्यापूर्वी त्यांनी घरात एक चिट्ठी फेकली. त्या चिठ्ठीवर बंबीहा गॅंग असे लिहिलं होतं. त्यानंतर एकाने थेट गोळीबार सुरु केला. तसेच त्याचा व्हिडीओ सुद्धा बनवला.

हेही वाचा – कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी १५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा हल्ला केला. दोघांना अमेरिकेतील पवन शौकीन नावाच्या व्यक्तीने या हल्ल्याची सुपारी दिली होती. या हल्ल्यानंतर उद्योगपतीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ याप्रकरणाचा तपास सुरु केला.

हेही वाचा – लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा ठावठिकाणा लागला! अमेरिकेनं भारताला दिली माहिती, प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

दरम्यान, याप्रकरणाच्या तपासादरम्यान दोन्ही आरोपी त्यांच्या एका सहकाऱ्याला भेटण्यासाठी नजफगढ येथे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला होता. दोघेही मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस दिसताच त्यांनी मोटारसायकल विरुद्ध दिशेने वळवली. तसेच त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही त्यांच्यावर गोळीपबार केला. या गोळीबार मोटरसायकल चालवण्याऱ्या आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्यामुळे दोघेही खाली पडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawrence bishnoi gang rival bambiha gang firing at businessman house in delhi spb