बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पप्पू यादव यांनी आज माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. याप्रकरणी पप्पू यादव यांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहित सुरक्षेत वाढ करण्याची मागणीही केली. खासदार पप्पू यादव यांच्या तक्रारीनंतर बिहार पोलिसांनीही याप्रकरणाचा तपास सुरू केल्याची माहिती आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरेन्स बिष्णोई टोळीने पप्पू यादव यांना कॉल करत धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी पप्पू यादव यांना सलमान खान प्रकरणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन आहोत. तू सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा बाबा सिद्दिकींप्रमाणे तुझीही हत्या करू अशी धमकी फोन करणाऱ्याने दिल्याचं पप्पू यादव यांनी सांगितलं.

salman khan life threat lawrence bishnoi gang
“जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
manoj jarange patil criticized devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी विनाकारण मराठ्यांचं वैर अंगावर घेतलं, ज्या मराठ्यांनी…”; मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!
Baba Siddique murder in Mumbai
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींची हत्या म्हणजे काँट्रॅक्ट किलिंग, आता पोलिसांना…”; छगन भुजबळ यांचा आरोप
Ramraje Nimbalkar, Ajit pawar NCP, NCP,
रामराजे निंबाळकर पक्षातच; कार्यकर्ते मात्र ‘तुतारी’ घेणार
Marathi actor Santosh Juvekar first look out of raanti movie
‘रानटी’ चित्रपटातील संतोष जुवेकरचा खतरनाक लूक आला समोर, चाहते म्हणाले, “भाऊ काय ऐकत नाय…”
Nitin Gadkari has given warning that he will suspend officials found guilty and blacklist the contractors
नितीन गडकरी म्हणाले “मी कमिशन घेत नाही, कामात कसूर केल्यास…”
Ramraje Naik Nimbalkar, Ranjit Singh Naik Nimbalkar,
तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू; रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान

हेही वाचा – बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्यांदरम्यान सलमान खान परदेशात करणार शो; चाहते म्हणाले, “भाईजान वाघासारखा…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लॉरेन्स बिष्णोई टोळीला लक्ष्य केलं होतं. कायद्याने परवानगी दिली तर लॉरेन्स बिष्णोई सारख्या गुंडाचे नेटवर्क २४ तासांत उद्ध्वस्त करेन, असे ते म्हणाले होते.

हेही वाचा – सासरच्या जाचाला कंटाळलेल्या जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीसही चक्रावले!

याशिवाय २५ ऑक्टोबर रोजी पप्पू यादव यांनी मुंबईला जात सिद्दिकी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. तसेच त्यावेळी त्यांनी सलमान खानला भेटण्याचाही प्रयत्नही पप्पू यादव केला होता. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सलमान खानशी फोनवर सविस्तर बोलणं झाले. तो निर्भयपणे काम करतो आहे. मी त्याच्याबरोबर आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता खासदार पप्पू यादव यांना लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे.