पीटीआय, नवी दिल्ली : नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाने गुरुवारी आफताब पूनावालाला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. काही प्रश्नांबाबत त्याची चौकशी करायची असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. त्याची नार्को चाचणी करण्यासही परवानगी देण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफताबविरोधात वकिलांची घोषणाबाजी

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी आफताब पूनावाला याच्याविरोधात वकिलांच्या एका गटाने गुरुवारी सायंकाळी नवी दिल्लीतील साकेत जिल्हा न्यायालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.  आरोपीला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच साकेत जिल्हा न्यायालयातील सुमारे १०० वकिलांनी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या आवारात गर्दी केली. पोलीस कोठडीत असलेल्या आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आरोपीने भयंकर आणि मानवतेला काळिमा फासणारा गुन्हा केला असल्याने त्याच्याविरोधात आम्ही घोषणाबाजी केली. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात यावा आणि जलदगती न्यायालयात लवकर निर्णय घेण्यात यावा,’ असे आंदोलक वकिलांनी सांगितले.