मागील काही दिवसांपासून लेयर शॉट या बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमुळे चांगलेच वादंग निर्माण झाले. या जाहिरातीतून लैंगिक शोषण तसेच सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर ही जाहिरात सर्व माध्यमावरुन काढण्याचा आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला. तसेच या जाहिरातीच्या प्रसारणावरही बंदी घालण्यात आली. दरम्यान या सर्व वादानंतर आता लेयर शॉट या बॉडी स्प्रे तयार करणाऱ्या कंपनीने जाहीर माफी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कचराकुंडीवर लावले पंतप्रधान मोदींचे फोटो, प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणी अरब देशांत तीव्र निषेध

“आम्ही कधीही कोणाच्याही भावना दुखावण्याचे काम केलेले नाही. महिलांचा अवमान करणाऱ्या संस्कृतीलाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही. आमच्या जाहिरातीमुळे काही लोकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे आम्ही माफी मागतो,” असे लेयर शॉटने म्हटले आहे. तसेच आम्ही सर्व प्लॅटफॉर्म्सवरून या जाहिरातीचे प्रक्षेपण थांबवण्याचे सांगितले आहे, असेदेखील या कंपनीने सांगितले आहे.

हेही वाचा >>> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : पाकिस्तानने व्यक्त केला निषेध, भारतानेही दिलं प्रत्युत्तर

दिल्ली महिला आयोगाने नोंदवीला होता आक्षेप

बॉडी स्प्रेची जाहिरात प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या होत्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावत स्प्रेच्या कंपनीविरोधात तक्रारा दाखल करण्याची मागणी केली होती. “या जाहिरातीच्या माध्यमातून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉडी स्प्रेच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावणार आहे. तसेच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनादेखील पत्र पाठवून या जाहिरातीचे प्रक्षेपण थाबंवण्याची विनंती करणार आहे,” असे स्वाती मालिवाल म्हणाल्या होत्या.

हेही वाचा >>> प्रेषित मोहम्मद अवमानकारक टिप्पणी प्रकरण : नुपर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्ली पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

या जाहिरातीवर अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत ट्विटर तसेच यूट्यूब आणि इतर माध्यमावरुन ही जाहिरात हटवण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा >>> जर ‘ही’ गोष्ट ऐकली असती तर आज सिद्धू जिवंत असता; मुसेवालाच्या मित्राने केला खुलासा

जाहिरातीमध्ये काय आहे?

बॉडी स्प्रेच्या जाहिरातीमध्ये चार-पाच तरुण आणि एक तरुणी दाखवण्यात आली होती. जाहिरातीमधील संवादादरम्यान द्विअर्थी शब्द वापरण्यात आले होते. तरुणांमधील द्विअर्थी संवादामुळे जाहिरातीमधील तरुणी काहीशी भेदरलेली दाखवण्यात आली होती. जाहिरातीमध्ये संवादामुळे तरुण बाजुला उभ्या असलेल्या तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करतायत असा संदेश काही क्षणासाठी जात होता. याच कारणामुळे या जाहिरातीवर आक्षेप नोंदवण्यात आला होता.