नेपाळचे माजी पंतप्रधान आणि माओवादी नेते प्रचंड यांचा समर्थक म्हणविणाऱ्या युवकाने सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कानशिलात लगावली. दिवाळीच्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. पश्चिम नेपाळमधील बागलुंग जिल्ह्य़ातील रहीवाशी असणाऱ्या पवन कुंवर २५ हा युवक दिपावलीनिमित्त प्रचंड यांच्या पक्षातर्फे आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला गेला होता. त्यावेळी पवन याने अचानक प्रचंड यांच्या कानाखाली मारली. अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रचंड यांचा चष्मा खाली पडला. मात्र लगेचच प्रचंड यांच्या कार्यकर्त्यांनी पवन याला बाजूला करून मारहाण केली. या मारहाणीत पवन गंभीर जखमी झाला. पोलिसांनी पवन याला अटक केली आहे.    

Story img Loader