देशात करोना सारखी परिस्थिती असतांना लोकांना महागाईचा देखील सामना करावा लागत आहे. गुरुवार, १३ मे २०२१ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून किंमतीत सातत्याने वाढ होत होती. तेल विपणन कंपन्यांनी ५ राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत इंधनाच्या दरात सात दिवस वाढ केली आहे. परंतु बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रूड बाजारात वाढ झाली असली तरी त्याचा परिणाम देशांतर्गत किंमतींवर दिसून आला नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून स्थिर असलेल्या किंमती २ मे रोजी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर वाढू लागल्या आहेत. २ मेपासून सात दिवस किंमती वाढविण्यात आल्या असून या सात दिवसांत पेट्रोल १.६८ रुपयांनी तर डिझेल १.८८ रुपयांनी महागले आहे.
याशिवाय मध्य प्रदेशातील भोपाळ आणि अनुपपूर, राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि महाराष्ट्रातील परभणी अशी चार क्षेत्रे आहेत. जिथे पेट्रोल १०० च्या पलिकडे विकले जात आहे. प्रीमियम पेट्रोलची किंमत १०० च्या पलीकडे आहे.
काय आहेत आजचे दर?
देशातील मेट्रो शहरांबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९२.०५ रुपये आहे. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर ८२.६१ रुपये दराने विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल ९८.३६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९३.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८७.७५ रुपये प्रति लिटरल विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ९२.१६ रुपये आणि डिझेलची किंमत ८५.४५ रुपये प्रतिलिटर आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर कसे कराल चेक?
देशात तेलाच्या दरांमध्ये दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू आहेत.
आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.