Lebanon Pager Blast weapons against by Israel Mossad : गेल्या काही महिन्यांपासून इस्रायल व लेबनॉनमधील अतिरेकी संघटना हेझबोलामध्ये संघर्ष चालू आहे. अशातच मंगळवारी हेझबोलाच्या अतिरिक्यांकडील व काही अधिकाऱ्यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून २,८०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्रायलच्या गुप्तचरांनी या पेजर्समध्ये स्फोटकं लपवली होती असा आरोप हेझबोलाने केला आहे. या पेजर्सवर एक संदेश आला आणि क्षणातच सर्व पेजर्सचा स्फोट झाला. तैवानमधील गोल्ड अपोलो कंपनीने हे पेजर्स विकसित व उत्पादित केले होते.

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून या पेजर्समध्ये स्फोटकं ठेवली होती. कंपनीने हे पेजर्स हेझबोलाला विकले होत. मंगळवारी (१७ सप्टेंबर) या पेजर्सवर एक संदेश आला आणि हे संदेश पाहण्यासाठी पेजरचं बटण दाबताच पेजर्सचा स्फोट झाला, असं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने प्रसिद्ध केलं आहे. हेझबोलाने काही महिन्यांपूर्वी तैवानमधील गोल्ड अपोलो कंपनीकडून ५,००० पेजर्स खरेदी केले होते. मात्र हे पेजर्स इस्रायलच्या मोसादने मोडिफाय केले होते. ते करत असताना त्यांनी या पेजर्समध्ये रिमोट-ट्रिगर यंत्रणेसह सुसज्ज अशी लहान आकाराची स्फोटकं ठेवली होती, जी एका संदेशाद्वारे सक्रीय करणं शक्य होतं.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज

हे ही वाचा >> Lebanon Pager Blast : मोसादचा कट, इस्रायली तंत्रज्ञान की पेजर कंपनीशी साटंलोटं? कोणी व कसा केला लेबनॉनमध्ये हेझबोलावर हल्ला?

पेजर्समध्ये लपवून ठेवलेली स्फोटकं अनेक महिने हे पेजर्स वापरल्यानंतरही कोणाला सापडली नाहीत अथवा त्यांचा हेझबोलाला सुगावा लागला नाही. पारंपरिक स्कॅनिंग पद्धतीने ही स्फोटकं शोधता आली नाहीत. मंगळवारी ही स्फोटकं सक्रीय करण्यात आली. त्यानंतर झालेल्या साखळी स्फोटांमध्ये तब्बल २८०० लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, इस्रायलच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ असं हेझबोलाने म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात; दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जनतेचा कौल कोणाला?

“पेजरची निर्मिती करणाऱ्या कंपनीला हाताशी धरून इस्रायलने हा हल्ला केला”

इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आणला की त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साटंलोटं करून अथवा एखादं नवं तंत्रज्ञान विकसित करून हेझबोलावर हा हल्ला केला? याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशातच हेझबोलाने आरोप केला आहे की “हा हल्ला इस्रायलनेच घडवून आणला होता. डिव्हाइस हॅक करून त्यांनी हा हल्ला केला. मोसादने पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून हा हल्ला घडवून आणला”.

Story img Loader