Lebanon Pager Blast Mossad Conspiracy : लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत हिजबुल्लाहचे दहशतवादी आणि काही आरोग्य कर्मचारी जखमी झाले आहेत. तसेच लेबनॉनमधील एक राजदूतही जखमी झाले आहेत. हिजबुल्लाहच्या एका खासदाराचा मुलगा देखील या पेजर स्फोटात मरण पावला आहे. या पेजर स्फोटांमध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत. त्यापैकी काहींची परिस्थिती नाजूक असून मृतांची संख्या वाढू शकते.

दरम्यान, हा पेजर हल्ला नेमका झाला कसा यावर हिजबुल्लाह संशोधन करत आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आणला की त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साटंलोटं करून अथवा एखादं नवं तंत्रज्ञान विकसित करून हिजबुल्लाहवर हल्ला केला? याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत. हिजबुल्लाहने आरोप केला आहे की “हा हल्ला इस्रायलनेच घडवून आणला होता. डिव्हाइस हॅक करून त्यांनी हा हल्ला केला”. हिजबुल्लाहने म्हटलं आहे की “मोसादने पेजर बनवणाऱ्या कंपनीला हाताशी धरून हा हल्ला घडवून आणला”.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल

हे ही वाचा >> Lebanon Pager Blast : मोसादचा कट, इस्रायली तंत्रज्ञान की पेजर कंपनीशी साटंलोटं? कोणी व कसा केला लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहवर हल्ला?

इस्रायलने पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साटंलोटं करून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे

हिजबुल्लाहचे दहशतवादी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी पेजर्सचा वापर करतात. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा सॅटेलाइट्सच्या मदतीने मध्य-पूर्वेतील देशांमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. इस्रायलला आपल्या अंतर्गत घोडामोडी व बातचीत समजू नये यासाठी हिजबुल्लाहचे अतिरेकी पेजरचा वापर करतात. दरम्यान, हिजबुल्लाह ज्या पेजर्सचा वापर करत होती ते पेजर्स तैवानमधील कंपनी गोल्ड अपोलो लिमिटेडने तयार केले होते. याच कंपनीच्या पेजर्सचा स्फोट झल्याचं सांगितलं जात आहे. हिजबुल्लाहने आरोप केला आहे की या कंपनीला हाताशी धरून इस्रायलने हे स्फोट घडवून आणले आहेत.

हे ही वाचा >> Jammu Kashmir Election : जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला सुरुवात; दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जनतेचा कौल कोणाला?

हिजबुल्लाहचे आरोप, तर इस्रायलनेही खंडण केलं नाही

या पेजर स्फोटांच्या घटनेनंतर हिजबुल्लाहच्या एका अधिकाऱ्याने इस्त्रायलबरोबरच्या संघर्षातील सर्वात मोठी सुरक्षेतील त्रुटी असल्याचे सांगितले. हिजबुल्लाह व इस्रायलमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाले असल्याचं सांगितलं जात आहे. हिजबुल्लाहने इस्रायलवर केवळ आरोप केले आहेत. ते याप्रकरणी कोणताही पुरावा सादर करू शकले नाहीत. दुसऱ्या बाजूला, इस्रायलने हिजबुल्लाहच्या आरोपांचं खंडण केलेलं नाही.

हे ही वाचा >> Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…

हिजबुल्लाहने म्हटलं आहे की आमचे लढवय्ये व विविध संस्थांतील अधिकाऱ्यांनी वापरलेल्या अनेक पेजर्सचा स्फोट झाला आहे. या स्फोटांमध्ये अनेकजण जखमी झाले आहे. तसेच त्यांनी जनतेला अफवांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Story img Loader