Lebanon Walkie Talkies Blasts : बुधवारी (१८ सप्टेंबर) दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, ते वॉकीटॉकी जपानच्या आयकॉम कंपनीचे असल्याचंही पुढे आलं आहे. त्यानंतर आता आयकॉम कंपनीनेही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कंपनीने लेबनानमधील स्फोटानंतर निवेदन जारी करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या वॉकीटॉकींचा स्फोट झाला आहे, त्या मॉडलची निर्मिती कंपनीने दशकभरापूर्वीच बंद केली होती, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. तसेच यासंदर्भात तपास सुरू असून आम्ही लवकरच एक सविस्तर निवेदन जारी करू, असंही त्यांनी सांगितलं आहे.

Hezbollah leader Sayyed Hassan Nasrallah
Lebanon : “ही युद्धाची घोषणा समजा”, लेबनॉनमधील पेजर्सच्या स्फोटानंतर हेझबोलाच्या प्रमुख नेत्याचं विधान
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Ajit Doval
Ajit Doval : अमेरिकेतील न्यायालयाचं भारत सरकार व अजित डोवालांना समन्स, नेमकं प्रकरण काय?
harsh goenka 600 daily saving post
Harsh Goenka Social Post: “दिवसाला ६०० रुपयांची बचत करा”, हर्ष गोएंकांचा सल्ला; नेटिझन्सची आगपाखड, तर नोकरदारांनी मांडला हिशेब!
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
Delhi-Mumbai Expressway Road caved
पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेला मुंबई-दिल्ली महामार्ग उंदरामुळे खचला, अजब दावा करणाऱ्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी
sanjay raut arendra modi amit shah
One Nation One Election : “भाजपा सरकारचा ‘नो नेशन, नो इलेक्शन’चा मनसुबा”, संजय राऊत आक्रमक; म्हणाले, “महापालिका निवडणुका घेता येईनात अन् निघाले…”
Who is IPS Shivdeep Lande why he is resign
IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?

हेही वाचा – Lebanon Explosion : लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी

कंपनीने नेमकं काय म्हटलंय?

लेबनानमध्ये आयकॉम कंपनीच्या वॉकीटॉकींचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. मात्र, ते वॉकीटॉकी आमच्या कंपनीने लेबनानमध्ये शिफ्ट केले होते का? याबाबत अद्याप स्पष्टपणे सांगता येणं कठीण आहे. या घटनेत ज्या मॉडेलचा स्फोट झाला आहे, त्या मॉडेलमध्ये बॅटरीचा वापर केला जातो. या मॉडेलची निर्मिती आम्ही २०१४ मध्ये बंद केली आहे. तरीही आम्ही यासंदर्भात तपास करत आहोत, असं कंपनीने म्हटलं आहे.

लेबनानमध्ये दोन दिवसांत दोन मोठे स्फोट

दरम्यान, बुधवारी (१८ सप्टेंबर) लेबनानमध्ये हेझबोलाहने वापरत असलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला होता. या घटनेत २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, तर जवळपास ४५० जण जखमी झाले होते. जखमींवर आता रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाचे म्हणजे या घटनेच्या एक दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी (१७ सप्टेंबर) लेबनानमध्ये जवळपास १००० पेजरचे स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेतही १० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, तर तब्बल २,८०० लोक जखमी झाले. प्रामुख्याने राजधानी बैरूट आणि इस्रायल-लेबनॉन सीमाभागातील शहरांमध्ये स्फोट झाले होते.

हेही वाचा – Israel : मोसाद नव्हे ‘युनिट-८२००’ ने लेबनॉनमध्ये पेजर्स, वॉकी-टॉकीचे स्फोट घडवले; इस्रायलच्या नव्या गुप्तचर यंत्रणेबद्दल जाणून घ्या

मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतेक पेजर हेझबोलाने तस्करी करून लेबनॉनमध्ये आणले होते. पेजरमधील लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण अशा प्रकारे सदोष पेजरही इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही कसे होऊ शकतात, हे कोडे उलगडलेले नाही. लिथियम हे बहुतेक आधुनिक उपकरणांमध्ये वापरले जाते आणि उच्च उष्णतेमध्येही त्यांचा स्फोट होत नाही म्हणून लिथियम बॅटरी सुरक्षित मानली जाते. तरीही पद्धतशीरपणे ज्या प्रकारे स्फोट झाले, तो इलेक्ट्रॉनिक युद्धाचा प्रकार असू शकतो का, याविषयी सामरिक आणि तंत्र विश्लेषक गोंधळलेले आहेत.