सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सौदी अरेबियात आलेल्या भारतीय कामगारांचा व्हिसा नियमित करण्यात येणार असून त्यांना नव्या नोकऱ्याही देण्यात येणार आहेत. ज्या कामगारांना स्वखुशीने मायदेशी परतण्याची इच्छा आहे त्यांनी सौदी अधिकाऱ्यांशी तीन महिन्यांच्या कालावधीत संपर्क साधावयाचा आहे.
सौदीच्या कामगार मंत्रालयाने या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली असल्याचे रियाधमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री वायलर रवि आणि सौदीचे कामगारमंत्री अदेल फकीह यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
सौदी अरेबियात भारतीय कामगारांना नियमित करणार
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून सौदी अरेबियात आलेल्या भारतीय कामगारांचा व्हिसा नियमित करण्यात येणार असून त्यांना नव्या नोकऱ्याही देण्यात येणार आहेत. ज्या कामगारांना स्वखुशीने मायदेशी परतण्याची इच्छा आहे त्यांनी सौदी अधिकाऱ्यांशी तीन महिन्यांच्या कालावधीत संपर्क साधावयाचा आहे.
First published on: 05-05-2013 at 12:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legally working indians in saudi arabia to be regularised