बंगळुरूमधील विबग्योर शाळेत रविवारी बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. शाळेत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच त्याला पकडण्यासाठी स्थानिकांची धावपळ सुरू झाली. यातच बिबट्याने शाळेतील दोन व्यक्तींवर हल्ला केला. तब्बल १४ तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. रविवार असल्याने शाळेला सुटी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Story img Loader