वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी अनेकदा वाहनचालक चुकीच्या दिशेना गाडी चालवताना सर्रासपणे दिसत असतात. मात्र गुजरात पोलिसांनी अशा वाहनचालकांना चाप घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. एखादा वाहनचालक दोन वेळा चुकीच्या दिशेने वाहन चालवताना दिसला तर त्याचा परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय पोलिसांनी आरटीओसोबत मिळून घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा वाहनचालक पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन करताना पकडला गेला तर त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल. तसंच त्याची कागदपत्रं आरटीओकडे जमा करण्यात येईल. यानंतर आरटीओ अधिकारी तीन ते सहा महिन्यांसाठी त्याचा वाहतूक परवाना रद्द करेल. पण नंतर ती व्यक्ती तोच गुन्हा करताना पुन्हा पकडली गेली तर त्याचा वाहतूक परवाना कायमचा रद्द केला जाईल. इतकंच नाही तर त्याला ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे.

डीसीपी (वाहतूक) संजय खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘याआधी एखादी व्यक्ती किमान पाच वेळा नियमांचं उल्लंघन करताना पकडली गेली तरच त्याचा परवाना रद्द केला जात असे. मात्र आता कायद्यात बदल करण्यात आला असून वाहतूक पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला दोन वेळा पकडलं तर आरटीओला त्याचा परवाना रद्द करण्याची शिफारस करु शकतात’.

विशेष म्हणजे पोलिसांनी नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत सात जणांचा वाहतूक परवाना रद्द करण्यात आला आहे. भविष्यात ही कारवाई अजून कठोर केली जावी यासाठी प्रयत्न असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.