लेफ्टनंट जनरल मनोज पांडे ( Lieutenant General Manoj Pande ) यांचे नाव देशाच्या नव्या लष्कर प्रमुख पदी निश्चित करण्यात आलं आहे. विद्यमान लष्कर प्रमुख जनरल मनोज ( General Manoj Mukund Naravane ) नरवणे हे येत्या ३० एप्रिलला निवृत्त होत आहेत. नवी दिल्लीत लष्कर प्रमुखांच्या कार्यालयात मनोज पांडे हे नरवणे यांच्याकडून लष्कर प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारतील. सध्या लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या श्रेणीत मनोज पांडे हे नरवणे यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत.

विशेष म्हणजे ‘इंजिनीयर कोर’मधील मनोज पांडे पहिले अधिकारी आहेत जे लष्कर प्रमुख पदी विराजमान होणार आहेत. पांडे हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे स्नातक असून ते इंजिनीयर कोरमध्ये १९८२ला सेवेत दाखल झाले होते. डिसेंबर २००१ ला संसदेवरील हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन पराक्रम ( Operation Parakram ) ही मोहिम राबवली होती ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र सैन्य हे पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात आले होते. तेव्हा जम्मूमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या पल्लनवाला भागात इंजिनीयरच्या तुकडीचे नेतृत्व पांडे यांनी केले होते.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
collector bro kerala ias officer n prashantha suspended
Kelara IAS Officer: ‘कलेक्टर ब्रो’ IAS अधिकारी निलंबित; वरीष्ठ अधिकाऱ्यावर जाहीररीत्या आगपाखड केल्यावरून कारवाई!
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

जनरल नरवणे हे निवृत्त होत असले तरी त्यांचे नाव हे संरक्षण दल प्रमुख ( Chief of Defence Staff )पदासाठी चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी बिपीन रावत यांचे अपघाती निधन झाल्याने ते पद रिक्त आहे. तेव्हा नरवणे निवृत्त होतांना संरक्षण दल प्रमुख पदाबाबतही काय निर्णय होणे अपेक्षित आहे.