येथून २५ किमी अंतरावर असलेल्या संबळ परिसरातील मरकंडल खेडय़ात पहाटे लष्कराच्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात लष्करी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लष्कराने स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागल्याचे सांगितले. संबळकडे जाताना यासिन मलिकसह पाच फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. फुटीरतावाद्यांनी सोमवारी काश्मीर बंदचे आवाहन केले आहे.
ही घटना  दुर्दैवी घटना असल्याचे उच्च शिक्षणमंत्री मोहम्मद अकबल लोन यांनी सांगितले. इरफान अहमद गनई आणि इर्शाद अहमद दर अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.  एका तरुणाच्या हत्येत लष्कराचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तर दुसऱ्या घटनेत लष्कराची रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न जमावाने केला त्या वेळी लष्कराने स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात हा तरुण मृत्युमुखी पडला. जेकेएलएफचा चेअरमन यासिन मलिकसह पाच फुटीरतावादी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मलिकसह शौकत अहमद बक्षी, बशीर अहमद काश्मीर, शाहीद मकया आणि जावेद अहमद मिर यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा