नरेंद्र मोदी यांनी आपली विजयी घौडदौड सुरू ठेवत सलग तिस-यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग गाठला. त्यांचा जन्म वाढनगर येथील इतर मागासवर्गीय समाजातील एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. वडील दामोदरदास मुलचंद मोदी व आई हीराबेन यांच्या सहा मुलांपैकी नरेंद्र मोदी हे तिसरे सुपुत्र आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील नरेंद्र मोदींचा सहभाग होता. ९०च्या दशकात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरात आणि हिमाचलप्रदेश मध्ये निवडणुकांच्या प्रचाराची मदार नरेंद्र मोदींकडे सोपीवली होती. त्यानंतर आपल्या राजकीय परिश्रमातून आँक्टोबर २००१ साली नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. विकासाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करत मोदींनी गुजरातचा कायापालट केला. परंतु २००२ सालच्या गुजरात दंगलीमुळे डागाळलेली   प्रतीमा सुधारण्यात त्यांना अपयश आले. नरेंद्र मोदी गुजरात राज्याला दिशाहीन करतील अशा वार्तांचे पेव फुटले होते. आत्ताच्या या सलग तिस-या विजयानंतर अशा वार्तांना पुर्ण विराम लागल्याचे स्पष्ट होते. या विजयाने मोदी राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत.  तर पुढील भारताचे पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाला गुजरात जनतेकडून दुजोरा मिळाला आहे. भाजप पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार देण्यासाठी झगडत असतांना मोदींचे नाव वारंवार पुढे येत असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा