संपूर्ण देशी बनावटीचे ‘तेजस’ हे लढाऊ विमान भारतीय हवाई दलात दाखल होण्यासाठी सज्ज झाले आहे. तेजस सेवेत दाखल होण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी परवानगी दिली.
बंगळुरू येथील विशेष कार्यक्रमात संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी तेजसचा परवाना हवाई दलप्रमुख एन. ए. के. ब्राऊनी यांच्याकडे सोपवला आणि हवाई दलात दाखल होण्याचा या लढाऊ विमानाचा मार्ग मोकळा झाला. २०१४च्या अखेपर्यंत या विमानाला हवाई दलात दाखल होण्याची अंतिम परवानगी प्रक्रिया पूर्ण होईल, असे अँटोनी यांनी सांगितले. हवाई दलात ‘मिग २१’ची जागा तेजस घेणार आहे.
तीन दशकांनंतर अनेक अडचणींवर मात करीत तेजस विमाने तयार करण्यात आली आहेत. हवाई दलाला सोपवण्यासाठी २०१४ पर्यंत चार आणि २०१६ पर्यंत आठ विमाने तयार करण्यात येतील, असे या विमानाची निर्मिती करणाऱ्या ‘एविएशन डेव्हलपमेंट एजन्सी’चे संचालक पी. एस. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.

वैशिष्टय़े
संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान
एकच इंजिन
वजन : ५६८० किलोग्रॅम)
उंची : ४.४० मीटर
लांबी : १३.२० मीटर
वेग : ताशी १३५० किलोमीटर
इंधन क्षमता : ३००० लिटर

Story img Loader