मंगळावर एक तरूण विवर सापडले असून त्यातील पुराव्यानुसार लाल रंगाच्या ग्रहावर साधारण दोन लाख वर्षांपूर्वी  द्रव स्वरूपातील पाणी वाहत होते असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. गोथेनबर्ग विद्यापीठाचे अँड्रियस जॉनसन यांनी सांगितले की, मंगळाच्या मध्य अक्षांशावर दक्षिणकडे हे विवर आम्हाला सापडले असून त्यात मंगळावर पूर्वीच्याकाळी पाणी होते असे दिसून आले आहे. मंगळाचा दक्षिण अर्धगोलार्ध हा विवरांचा भाग असून तेथे काही ढिगारे तर काही छोटय़ा दऱ्या आहेत. जेव्हा चढावरील माती पाण्याने संपृक्त होत असे तेव्हा ते मिश्रण घट्ट होऊन जागेवरच चिकटत असे. त्यामुळे ढिगारा व पाणी खाली वाहून एक वाहिनीच तयार होत असे, त्याला डेब्री फ्लो असे म्हणतात. पृथ्वीवर असे प्रवाह नेहमी दिसून येतात त्यामुळे बरेच नुकसान व मनुष्यहानी होते. या प्रवाहांमुळे दगड, माती व पाणी यांचे मिश्रण उतारावरून वाहून येते. नंतर हे वाहणे थांबले की, त्यावर आणखी थर साठत असत. जॉनसन यांच्या मते हा जमिनीचा एक प्रकार असून त्याची तुलना सावलबार्ड येथील हवाई छायाचित्रण केलेल्या जमिनीशी करता येईल. मंगळावरील ढिगाऱ्यांचे प्रवाह हे त्याकाळात मंगळावर पाणी मोठय़ा प्रमाणावर वाहत होते याचे पुरावे देतात. सवालबार्ड येथील शोधकायार्वरून आम्हाला आश्चर्यकारक निष्कर्ष मिळाले असून ज्या विवरात पाण्याचे पुरावे सापडले ते तरूण आहे. विवराचे वय साधारण २ लाख वष्रे असावे त्यामुळे मंगळावरील हिमयुगात त्याची निर्मिती सुरू झाली व चार लाख वष्रे चालू होती. नंतर ती संपली. मंगळावर घळया नेहमीच्याच आहेत. पण पूर्वी अभ्यास केलेल्या घळया किंवा दरीसारखी विवरे ही जुनी होती. आता नवीन विवरात तसे पुरावे मिळाले आहेत व ते विवर तुलनेने तरूण आहे. त्यामुळे त्याचा संबंध मंगळावरील हिमयुगाशी जोडता येतो, त्यावेळी उपलब्ध परिस्थितीचा परिणाम या विवरावर झाला असावा असे जॉनसन यांचे मत आहे. या विवरातील थरांशी येथील वितळलेल्या पाण्याचा संबंध आहे व या तुलनेने अलीकडच्या घटना आहेत. मध्य अक्षांशावर हे विवर मंगळाच्या दक्षिण गोलार्धात असून ते रॅमपर्ट इजेक्टा या जवळच्या मोठय़ा विवरावर तयार झाले आहे. रॅमपर्ट इजेक्टा या विवरातही काही प्रवाह होते असे दिसते ते यजमान विवर असून वैज्ञानिकांच्या मते हिमाने परिपूर्ण अशी जमीन हे ते विवर तयार होण्याचे कारण असावे. जर्नल इकॅरस या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा