भाजपा नेत्याच्या मुलाने मंदिरामध्ये खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपा नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन याने सोमवारी पासी समाजासाठी श्रावण देवी मंदिरामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी खाद्यपदार्थांच्या पाकिटात दारुच्या बाटल्या भरलेल्या होत्या. बिझनेस स्टँडर्डने हे वृत्त दिले आहे.

कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये नितीन अग्रवाल व्यासपीठावरुन खाद्य पदार्थांची पाकिटे गावाच्या प्रमुखाला देण्यात येतील. त्यांच्याकडून तुम्हाला ही पाकिटे मिळतील अशी घोषणा करताना दिसत आहेत. खाद्यपदार्थांच्या पाकिटाचे वाटप सुरु आहे तिथे गावच्या प्रमुखांनी जाऊन पाकिटे आपल्या ताब्यात घ्यावीत व सोबत आलेल्या लोकांना वाटप करावे असे अग्रवाल उपस्थितांना आवाहन करत होते.

हे पाकिट मिळालेल्या एका व्यक्तीने खाद्यपदार्थाच्या पाकिटातून दारुची बाटली मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाला आलेल्या लहान मुलांना सुद्धा या पाकिटाचे वाटप करण्यात आले. मी माझ्या वडिलांसोबत लांबून आलो आहे. नितीन अग्रवाल यांनी हे पाकिट दिले असे एका मुलाने सांगितले.

हरदोई येथील भाजपा खासदार अंशुल वर्मा यांनी खाद्यपदार्थांसह दारुचे वाटप केल्याबद्दल अग्रवाल यांच्यावर टीका केली. पक्षनेत्यांकडे आपण याची तक्रार करु असे वर्मा यांनी सांगितले. नरेश अग्रवाल आधी समाजवादी पार्टीमध्ये होते. मार्च २०१८ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे आयोजन करणारा त्यांचा मुलगा नितीन आमदार आहे.

 

Story img Loader