केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी शिवगंगा लोकसभा मतदारसंघासाठी ना काही केले, ना राज्यासाठी काही केले, या शब्दांत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी चिदंबरम् यांच्यावर येथे टीकेची तोफ डागली. चिदंबरम् यांनी राज्यासाठी काहीही केलेले नाही, हे संपूर्ण तामिळनाडू राज्यास ठाऊक आहे, असेही जयललिता यांनी येथील प्रचारसभेत ठणकावले.
काही राज्यांमधील उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने सवलती दिल्या असून चिदंबरम् यांनाही असे येथे करता आले असते; परंतु त्यांनी काही केले नाही, असे जयललिता म्हणाल्या. याच चिदंबरम् यांच्यासाठी आपण एकेकाळी लोकांकडे मते मागितली होती, हे सांगण्यास जयललिता विसरल्या नाहीत